टिकेकर, अरविंद
अरविंद टिकेकर मुंबई विद्यापीठाच्या गंथालयाचे मुख्य गंथपाल म्हणून इतरांसमोर प्रकाशात आले. या मानाच्या पदावरून निवृत्त झाल्यानंतरही ते त्यांच्या आवडीच्या गंथपालन शास्त्रात मन:पूर्वक रमले होते. किंबहुना, नोकरीपेक्षाही अधिक व्यग्र झाले होते. ज्ञानक्षेत्रातली वाटचाल टिकेकरांच्या रक्तात वारसाहक्कानेच आली होती. त्यांचे काका श्री. रा. टिकेकर यांचा विविध विषयांमधला अधिकार, त्यांची चिकित्सावृत्ती आणि अभिजात अभिरुची यांचा संस्कार अरविंद आणि अरूण या दोन्ही भावांवर झाला. अरविंद टिकेकर यांची गंथपाल म्हणून जी जडण-घडण झाली तीच मुंबई विद्यापीठाचे दंतकथा बनलेले मुख्य गंथपाल प्राध्यापक दारा मार्शल यांच्या हाताखाली. टिकेकर यांनी मार्शल यांचा हा वारसा सांभाळला, संपन्न केला.
[…]