वारणा उद्योगसमूहाची स्थापना करणारे सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांचा जन्म पन्हाळा तालुक्यातील कोडोवली येथे १७ ऑक्टोबर १९१७ रोजी झाला.
१९३९ मध्ये कोल्हापूरमध्ये झालेल्या प्रजापरिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीतही ते सक्रिय होते. भूमिगत क्रांतिकारकांना त्यांनी आश्रय दिला.
त्यांनी सहकारी तत्त्वावर वारणेकाठी साखर कारखाना उभारला आणि त्या परिसराच्या विकासाद्वरे त्याचे नंदनवन करायचे हे त्यांनी आपले जीवितध्येय प्रत्यक्षात उतरविले.
वारणा बाजारपासून ते वारणा औद्योगिक वसाहतीपर्यंत, वारणा कागदापासून वारणा श्रीखंडापर्यंत तसेच वारणा बालवाद्यवृंदापासून ते इंजिनियरींग महाविद्यालयापर्यंत हे जे विकसित कामाचे डोंगर उभे झाले ते केवळ तात्यासाहेब कोरे यांच्या कर्तृत्वातूनच. उजाड माळरानावर हरितक्रांती साकारून त्यातून ज्ञान, कला, क्रीडा, व्यवसाय, उद्योग इत्यादीतून त्यांनी वारणेकाठी संपन्न भरभराटीचे विश्व उभे केले.
दि. १३ डिसेंबर १९९४ रोजी त्यांचे निधन झाले.
Leave a Reply