मराठी पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांचा जन्म ४ नोव्हेंबर रोजी झाला.
उत्तरा केळकर यांचे शास्त्रीय संगीताचे गुरू पं. फिरोज दस्तूर. व गाण्याचे गुरू श्रीकांतजी ठाकरे. ज्या गाण्यांनी काही वर्षांपूर्वी गणेशोत्सव गाजवला आणि आज इतक्या वर्षांनंतरही ते गाणे ऐकू येते ते म्हणजे ‘अशी चिक मोत्यांची माळ होती ग तीस तोळ्याची ग’ हे गाणे गायिका उत्तरा केळकर यांनीच गायले आहे. उत्तरा केळकर यांचे ‘बिलनशी नागिन निघाली, नागोबा डुलायला लागला’ हे गाणेही लोकप्रिय आहे.
हिंदी चित्रपटात त्या जास्ती गायल्या नाहीत. बप्पी लाहिरी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आनंद-मिलिंद, राम-लक्ष्मण व काही इतर संगीतकारांकडेही हिंदी चित्रपटांसाठी गाण्याची संधी त्यांना मिळाली. १९८४ ते १९९८ पर्यंत त्या बप्पी लाहिरी यांच्या कार्यक्रमांत गात असत.
अधिक विस्तृत लेखासाठी
Leave a Reply