
वरूण वेलणकर हे पुण्याचे रहिवासी असून व्हाईट कॉपर एन्टरटेंमेंट या मार्केटिंग क्षेत्रात जगप्रसिध्द असलेल्या कंपनीमध्ये ते मानाच्या हुद्यावर काम करीत आहेत. वरुण हे त्यांच्या उत्तम तंत्रशुध्दपणाबद्दल तसेच कोणत्याही गोष्टीची प्रभावी जाहिरात करण्यासाठी त्यांना अवगत असलेल्या मार्केटिंग कसबांसाठी प्रसिध्द आहेत. कोणत्याही खेळाचा मोठा एव्हेन्ट असो किंवा बाजारात नव्याने आलेल्या एखाद्या खाद्यपदार्थाची किंवा सौंदर्यप्रसाधनाची जहिरात अथवा प्रसिध्दी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाच्या दिवशी फलके, बोर्ड, मोठे होर्डिंग्स आकर्षकरित्या व सुबकपणे डिझाईन करणे (सजविणे) व कमीत कमी शब्दांत आपला संदेश जास्तीत जास्त कलात्मकतेने ग्राहकांपर्यंत पोहोचविणे हे मोठ्या कल्पनाशक्तीचे काम असते. त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या सामाजिक समस्येबद्दल मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी मोहिम आयोजित करण्यात येते, त्यावेळी तिचा तालुकाभर प्रसार करण्यासाठी अद्ययावत जाहिरात तंत्राची, प्रसारमाध्यमांची, तसेच नव नवीन कल्पक युक्त्यांची व शक्कलींची नितांत गरज भासते. या सर्व पसार्याचा व्यवस्थित आराखडा बांधून देण्याचे व प्रत्य्क्ष डिझायनिंग चे काम ते करीत आहेत.
Leave a Reply