समाजवादी पक्षाचे कट्टर कार्यकर्ते श्री. वसंतराव नाचणे यांनी कै. दत्ताजी ताम्हणे यांच्या बरोबर खेडोपाडी खूप काम केले.
पूर्वीचे नामांकित वकील कै. वासुदेवराव नाचणे यांचे ते चिरंजीव. वडिलांचे अकाली निधन झाल्यामुळे वसंतरावांवर कुटुंबाची जबाबदारी आली. नोकरी, घरातील जबाबदारी सांभाळून पोलिसांच्या तावडीत न सापडता त्यांनी खूप काम केले. श्री. नाचणे “सानेगुरुजी” पुरस्काराचे मानकरी आहेत. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये राष्ट्रसेवादल व सानेगुरुजी कथामाला यांच्या माध्यमातून आपले समाजसेवेचे व्रत अखंड चालू ठेवले.
१९४१ मध्ये ठाणे येथील डॉ. बाळासाहेब गुप्ते यांच्या कन्या कुमुद गुप्ते यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
(संदर्भ : सीकेपी समाजाचा इतिहास)
Leave a Reply