वासुदेव सिताराम बेंद्रे

Bendre, Vasudev Sitaram

इतिहासाचे भीष्माचार्य वासुदेव सीताराम बेंद्रे यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८९४ रोजी पेणमध्ये झाला.

इतिहास संशोधकांचे मुकुटमणी वि. का. राजवाडे यांना गुरू मानून वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी त्यांची संशोधनाची परंपरा एकनिष्ठेने पुढे चालवली. शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास अथक संशोधन करून महाराष्ट्रालाच नव्हे, तर जगाला दाखवून देण्याचं अभूतपूर्व कार्य बेंद्रे यांनी केलं आहे.

संभाजी राजांची पराक्रमी, संकटाला धीरोदात्तपणे तोंड देणारी, धोरणी, मुत्सद्दी अशी तेजस्वी प्रतिमा लोकांसमोर आणण्याचं श्रेय बेंद्रे यांचंच.

छत्रपती शिवाजी महाराज पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, Maharashtra Of The Shivshahi Period, शिवराज्याभिषेक प्रयोग, संत तुकारामांचे अप्रकाशित अभंग, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज चरित्र, साधन-चिकित्सा, तुकाराम महाराज यांचे संत-सांगाती, देहूदर्शन, महाराष्ट्रेतिहासाची साधने, महाराष्ट्रेतिहासाचे संशोधन क्षेत्र व साधनसंपत्ती, राणा जयसिंग आणि शिवाजी महाराज, शीघ्रध्वनी- लेखनपद्धती – मराठी, A Study Of Muslim Inscription, Downfall of “Angre’s Navy”, Stenography For India, Tarikh-I-Elahi : Akbar’s Devine Era असे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

वासुदेव सीताराम बेंद्रे यांचे १६ जुलै १९८६ रोजी निधन झाले.


अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*