
प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या मातोश्री तसेच संध्या शांताराम या वत्सलाजींची बहीण होत.वत्सला देशमुख यांचे वडील श्रीधरपंत देशमुख हे बापुराव पेंढारकर यांच्या ललितकलादर्श कंपनीत होते.
शिर्डीचे साईबाबा हा मराठी आणि शिरडी के साईबाबा हा हिंदी चित्रपट त्याचप्रमाणे तुफान और दिया, जल बिन मछली नृत्य बिन बिजली, लडकी सह्याद्री की, हिरा और पत्थर,सुहाग मराठीत – अमर भूपाळी, वारणेचा वाघ, पिंजरा , झुंज, ज्योतिबाचा नवस, बाळा गाऊ कशी अंगाई, चिकट नवरा वगैरे चित्रपटांत त्यांनी भुमिका केल्या होत्या.
‘पिंजरा’ चित्रपटामध्ये वत्सला देशमुख यांनी खलनायिकेकडे झुकणारी भूमिका रंगवली होती.‘पिंजरा’या चित्रपटा मध्ये त्यांनी संध्या यांच्या बरोबर अभिनय केला होता.
प्रेक्षकांच्या मनावर त्यांच्या अभिनयाने गारुड निर्माण केलं होतं.
Leave a Reply