विद्याधर ठाणेकर हे साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, नाट्य, चित्रपट या क्षेत्रातील ठाण्यातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. सांस्कृतिक राष्ट्रजागरण, धर्मजागरण, यासाठी ते सतत उपक्रम राबवित असतात. ते ठाण्याच्या राजकारणात आणि समाजकारणात सक्रीय आहेत. ग्राहक संरक्षणाच्या क्षेत्रातही ते सक्रीय आहेत. ते मराठी नाट्य परिषद, कोमसाप तसेच इतर अनेक संस्थांचे कार्यकर्ते आहेत.
ठाण्याचे माजी आमदार कै गजाननराव कोळी यांचे ते पुत्र. त्यामुळेच ते अनेकदा `गजाननपुत्र’ या नावानेही लेखन करतात.
त्यांनी विविध विषयांवर बरीच पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे कोकणातील २५१ गणपती हे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या भाषणांच्या संग्रहाचा अनुवादही केला आहे.
ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कार्यवाह या नात्याने त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे.
संपर्क: इ-मेल: thanekar2000@gmail.com
भ्रमणध्वनीः ९८२१५ ६१३४४
Leave a Reply