हे मुळचे सोलापुरचे असणार्या प्रा. डॉ. विलास संगवे यांनी मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी आणि जैन समाज या विषयावर संशोधनात्मक प्रबंधक सादर करुन १९५० साली डॉक्टरेट संपादन केल्यावर सर्वप्रथम कर्नाटक महाविद्यालयात अध्यापन सुरु केलं, त्यानंतर राजाराम महाविद्यालय व पुढे शिवाजी कार्याचे संशोधन करण्यासाठी स्थापन केलेल्या शाहू संशोधन केंद्रामध्ये त्यांची संचालक म्हणून नियुक्ती झाली. तेथे त्यांनी एक तपाहून अधिक काळ छत्रपती शाहूंच्या सर्वांगीण कामाचे, संशोधन करुन पाच हजारा पेक्षा अधिक पृष्ठांचे नऊ खंड प्रकाशित केले. त्यासाठी त्यांनी २,६५५ शाहू कालीन कागदपत्रे संशोधित केली, व नऊ खंडांना त्यांनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनांचा ६५५ पृष्ठांचा एक स्वतंत्र खंड सुद्धा प्रकाशित करण्यात आला होता. राजर्षी शाहू महाराजांचे कार्य संगवेंनी अथक परिश्रमांनी इंग्रजी भाषेतही आणले. आज “ऑक्सफर्ड”, “केंब्रिज”, विद्यापीठांमध्ये शाहूंचे कार्य अभ्यासण्याची संधी अनेक परदेशी विद्यार्थ्यांना मिळत आहे; यासोबतच डॉ.विलास संगवे यांची जागतिक विद्वानांमध्ये गणती होती ती त्यांनी केलेल्या जैन धर्माच्या संशोधनासाठी, जैन विद्या, समाजजीवन, इतिहास या विषयावर त्यांनी लिहिलेले १०० हून अधिक ग्रंथ विद्यमान्य तसेच त्यांचे मराठी व इंग्रजी भाषांतील काही ग्रंथ गुजराती, कन्नड, फ्रेंच व जपानी भाषेत अनुवादित झाले आहेत. उत्तर अमेरिकेतील “जैन अकॅडेमिक फाऊंडेशन” (जाफना) तर्फे प्रयोजित केलेल्या ९ खंडांच्या जैन धर्म विश्वकोशाचे “जैन समाज” या स्वतंत्र खंडाचे संपादन ही डॉ. विलास संगवे यांनीच केलं आहे.
Leave a Reply