
अशोक शिंदे ! मराठी चित्रपट , मालिका आणि रंगभूमीवर मानाने घेतलं जाणारं नाव.
अशोक शिंदेचा जन्म १ जानेवारी १९७६ रोजी मुंबईत झाला. त्याने केलेल्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात रहातात. विशेष करून त्याने रंगवलेल्या खलनायकी भूमिका प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवून जातात. आतापर्यंत खलनायकाचं एक विशिष्ट रूप मराठी कलाक्षेत्रात दाखवलं जायचं , पण अशोक शिंदेने ते साफ मोडीत काढून खलनायक हा स्टलयलिश जरी असला तरी तो तितकीच , किंबहुना काकणभर जास्तच भीती मनात निर्माण करू शकतो हे दमदार अभिनयातून दाखवून दिलं.
आतापर्यंत त्याने अनेक दर्जेदार प्रोजेक्ट्स् केली आहेत. त्यापैकी लालबागची राणी , तु. का. पाटील , दंडित , काकण , रॉकी , आदेश – The power of Law , अष्टरूपा जय वैभवलक्ष्मी माता सारखे अनेक उत्तमोत्तम नावं घेता येतील. त्याने स्वप्नांच्या पलीकडे , पती माझे सौभाग्यवती , घरकुल सारख्या नावाजलेल्या मालिकांमधूनही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली.
एकेकाळी पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहाच्या रंगमंचावरून एक रंगभूषाकार म्हणून त्याने सुरुवात आणि तेव्हढ्यापुरताच तो मर्यादित राहिला नाही. नोव्हेंबर २०१७ साली त्याला ह्याच रंगमंचावर एक यशस्वी अभिनेता म्हणून ‘ सलाम पुणे ‘ नामक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
## Ashok Shinde
Leave a Reply