(१९२० – १९९५)
प्रा. वि. म. दांडेकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ होते.
६ जुलै १९२० रोजी सातारा इथे जन्मलेल्या दांडेकरांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समित्यांवर अर्थविषयक तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम बघितलं. भारतीय अर्थव्यवस्था आणि आर्थिक समस्यांविषयी त्यांनी सखोल संशोधन केलं. ‘पॉव्हर्टी इन इंडिया‘ हा त्यांचा सर्वात गाजलेला ग्रंथ. याखेरीज शेती, सहकार, लोकसंख्या, गरिबी, लघुउद्योग, अन्नधान्य समस्या, शेतीविषयक कायदे या विषयांवरही त्यांनी संशोधनपर लेखन केलं.
आर्थिक विकासाची मंद गती, अल्प राष्ट्रीय उत्पन्न व त्याचं असमान विभाजन या प्रश्नांचं गांभीर्य व त्यातून उत्पन्न झालेल्या परिस्थितीवर उपाययोजना यांची चर्चा ‘पॉव्हर्टी‘ इन इंडिया‘ या त्यांच्या ग्रंथात आहे. त्यांचा मूळ अभ्यासविषयक संख्याशास्त्र असल्याने नेमकेपणा आणि ठाम प्रतिपादन हे दांडेकरांच्या अर्थशास्त्रीय लेखनाचे विशेष आहेत. एकांगी टीकाकार न होता विधायक दृष्टीने समतोल विचार व त्यावर आधारित लेखन हे दांडेकरांचं वैशिष्टय म्हणावं लागेल.
Leave a Reply