युवकांसाठी “आम्ही युवककाला” या संस्थेची स्थापना करणारे स्थापना करणारे अणि दै. लोकमत, दै. महाराष्ट्र जनमुद्रा, दै. प्रहार येथे पत्रकारिता करणार्या विनोद पितळे यांचा ठाण्याला नेहमीच आदर वाटतो. बी. कॉम पर्यंत शिक्षण घेऊन सिद्धी फ्रेंड्स पब्लिकेशन, व्यास क्रिएशन्स येथून त्यांनी प्रकाशन क्षेत्रात पदार्पण करुन प्रकाशक म्हणून कार्य केले.
“ज्ञानेश्वर ते नायगांवकर” असा मराठी काव्याचा प्रवास ठाणेकरांसाठी सादर करणारे विनोद पितळे यांचे आजवर ५ पुस्तके, ३ ध्वनिफीती विविध लेखप्रकार असे विविध प्रकारचे साहित्य प्रसिद्ध आहे. २२ वर्षे साहित्य क्षेत्रात कार्य करणार्या विनोद यांनी विशेषांक समन्वयक म्हणून अनेक अंकाची निर्मिती केली आहे. ठाण्यातील युवकांसाठी आजवर साहित्य, पत्रकारिता या क्षेत्रांवर विविध उपक्रम त्यांनी राबविले आहेत. सामाजिकतेचे भान ठेवून सदरलेखातून त्यांनी जनजागृती केली आहे.
मनातील ठाणे :
ठाण्याविषयी बोलताना ते म्हणतात सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ठाणे शहराची ओळख प्रगतीच्या दिशेने आणि शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर शहर म्हणून होईल असा त्यांचा ठाम विश्वास आहे. उद्याचं ठाणे हे आजच्या सुसंस्कृत ठाणेकरांची आणि सुनियोजित प्रशासनाची सांगड घालून उभं राहिलेलं एक पवित्र मंदीर असेल.
पुरस्कार : त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना “साहित्यगौरव” या पुरस्काराने गौरविण्यात आले.
Leave a Reply