विरेंद्र तिखे हा संगणक क्षेत्रातील कल्पनाशक्तीशी निगडीत असलेला एक उत्साही तरूण आहे. कोणत्याही गैरप्रकारांनी व उचला उचली न करता, स्वछ हातांनी कोडींग केलेली संकेतस्थळे लोकांना बनवून देणे, आकर्षक आय कॉन्स तयार करणे, कमीत कमी गिचमिडीमधूनही ग्राहकांना खुप काही सांगून जाणारे लोगोस डिझाइन करणे, प्रेसेन्टेशन्स तयार करणे, यंत्र व त्याला वापरणार्यांमध्ये ॠणानुबंध तयार करणारे, साधे, सोपे परंतु सुबक इंटरफेसेस निर्माण करणे हा त्याचा व्यवसाय असला तरी व्यवसायापेक्षाही, आपल्या अचाट कल्पनाशक्तीचा अविष्कार ग्राहकांना कसा लाभ देईल याचाच विचार तो जास्त करत असतो. ग्राफिक डिझाईनींग, फ्लॅश अॅनिमेशन, एक्स एच.टी.एम.एल. व सी.एस.एस. वर आधारित संकेतस्थळे, या प्रातांमध्ये विशेष कौशल्यपुर्ण हात बसलेल्या विरेंद्रने अनेक ब्लॉग साईटस, व सी. एम. एस. या संकेतस्थळांसाठी आकर्षक व रेखीव डिझाईन्स तयार करून दिले आहेत. संकेतस्थळांची डिझाईन्स तयार करताना तिच्या मुखपृष्ठाला कुठलाही भडकपणा येणार नाही याची काळजी घेतानाच, ती अगदी कोरडीही राहणार नाही, व भेट देणार्यांशी ती प्रभावी संवाद व हितगुज साधु शकेल व आजच्या तरूणांना भावणार्या शैलीशी जुळवून घेऊ शकेल अशी प्राथमिक काळजी तो घेतो. निरनिराळ्या गडद, व फिक्या मनमोहक रंगसंगतीचे अनोखे रसायन असलेलली संकेतस्थळे तयार करण्यात त्याने प्राविण्य मिळविले आहे, व त्याने तयार केलेली कित्येक संकेतस्थळे आज भारताच्या कानाकोपर्यांतुन नावाजली गेली आहेत. व्ही रेन्डर या अशाच काही कलाप्रेमी तरूणांच्या क्रिएटीव्ह स्टुडियो मध्ये ग्राफिक डिझाईनिंग, वेबसाईट डिझाईनिंग व डेकोरेशन व इतर सर्व प्रकारच्या वेबसेवा ग्राहकांना पुरविण्यासाठी तो सदैव तयार असतो. फावल्या वेळेचा उपयोग तो चित्र काढणे, पारंपारिक पध्दतींनी व सी. जी. मिडीयाचा वापर करून ती रंगविणे, वेब सर्फिंग अशा कामांसाठी तो करतो.
Leave a Reply