विशाल रामचंद्र हरियाण यांचा जन्म 3 मार्च 1989 मध्ये झाला. मुळचे ते मराठी नसले तरी मराठी मातीत वाढल्यामुळे, मराठी सवंगडयांबरोबर मिसळल्यामुळे, व मराठी संस्कृतीत रूजल्यामुळे त्यांची नाळ याच भाषेच्या गर्भात अगदी खोलवर गेलेली होती. शाळेत असल्यापासुनच मराठीच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी काहीतरी भरीव व लक्षणीय करण्याची त्यांच्या मनी प्रचंड हुरहुर होती.
मराठी स्वाभिमानावर कुणी जाणून बुजून घाव करत असल्याचे पाहून त्यांना अशांचा प्रचंड संताप येई. तरूणपणी जेव्हा राज ठाकरेंनी मराठी अस्मिता जपण्यासाठी वेगळा पक्ष काढुन जेव्हा प्रखर आंदोलनाचे शस्त्र उगारण्याच निर्णय घेतला, तेव्हा त्या शस्त्राला युवाशक्तीची धार देण्याच्या हेतुने जे अनेक तरूण या लढयात एकजुटीने सहभागी झाले होते त्यात त्यांचे नाव अग्रभागी होते. राज ठाकरेंच्या विचारांनी व तत्वांनी वाहावत गेलेल्या, विशाल हरियाण यांनी तेव्हापासुन ते आजपर्यंत त्यांच्या अंगावर सोपविले गेलेले प्रत्येक काम अगदी चोखपणे व निर्धारित वेळेआधीच पुर्ण केले आहे. निकालस्वरूप आज ते जोगेश्वरी पश्चिम, येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे अध्यक्षपद भुषवित आहेत. मराठी माणसाचे हितसंबंध जोपासण्यात व ओळखी वाढवून आपल्या परिसरात मनसेवादी हितचिंतकांची तसेच पुर्ण वेळ कार्यकर्त्यांची सशक्त फळी उभी करण्यात त्यांनी जे असामान्य कौशल्य दाखविले आहे त्यास तोड नाही. हरियाण यांचे शालेय शिक्षण ओशिवर्यामधील बी. एम. सी. च्या शाळेत झाले. शालेय दिवसांपासूनच त्यांना राजकारण व समाजकारण या विषयांमध्ये विशेष गती होती. त्यांची उत्तम संभाषण कला व प्रसांगवधानी व्यक्तिमत्व त्यांच्या भविष्यातील उत्तम अशा राजकीय घडणीचीच द्योतके होती.
Leave a Reply