विठ्ठल वेंकटेश कामत

कामत, विठ्ठल वेंकटेश

एक जाणकार लेखक, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरण तसच पक्षीविद्यातज्ज्ञ,आणि पुरातन वस्तुंचे अभ्यासक, असणारे चतुर्रस्त्र व्यक्तिमत्व म्हणजे विठ्ठल व्यंकटेश कामत.

विठ्ठल कामत यांच नाव घेताच डोळ्यासमोर उभी रहातात “सत्कार“, “ऑर्कीड” आणि “सम्राट” सारखी विविध खाद्यसंस्कृतींनी परिपूर्ण अशी उपहारगृह.

मराठी माणसांना उद्योगासाठी प्रेरणा मिळेल अशीच या मराठी उद्योजकाची ख्याती आणि किर्ती आहे. यासाठी अपार मेहनत,  जिद्द, कल्पकता, उद्दमशीलता, तसच वेळप्रसंगी जबाबदारी घेण्याची वृत्ती आणि तयारी असावी हे विठ्ठल कामतांकडून निश्चितच शिकता येण्यासारखे गुण आहेत.

प्रयोगशील आणि अफाट कल्पना शक्ती लाभलेल्या विठ्ठल कामतांनी अतिशय नियोजनपूर्णतेनं उपहारगृह या संकल्पनेत अमूलाग्र बदल घडवून आणलेत आणि भारतीय उपहारगृहांना आधुनिक दर्जा देण्याचं श्रेय हे विठ्ठल कामतना जातं. कारण त्यांनी राबवलेल्या संकल्पनांना, आधुनिकतेसोबतच परंपरागत, आदरातिथ्याची उद्योगशीलतेची जोड होती.

हॉटेल उद्योग व्यतिरिक्त विठ्ठल कामतांनी पर्यावरणाला फायदेशीर ठरेल अशा अनेक प्रकल्पांची उभारणी केली आहे. हे विश्व, ही सृष्टी सदा हिरवळ आणि झाडा-झुडूपांनी तसंच प्राण्यांनी समृद्ध असावी असा त्यांचा मानस आहे. यासाठी “पाथरे गांव” सारख्या डोंगराळ भागात औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. मुंबईतील अनेक उद्यान दत्तक घेत शहर प्रदूषण विरहित बनवणं, आणि उल्लेख करावा अशा “फुलपाखरु उद्यानाची” समावेश करता येईल. “हरीण”, “कासव”, आणि दुर्मिळ पक्ष्यांचं संवर्धन होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत. तसंच ओडिसा येथील “चिलिका तलाव” येथे “डॉल्फीन ऑबझर्वेटरी सेंटर” ची स्थापना करण्यात आली आहे. त्याशिवाय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ऑर्कीड हॉटेल च्या परिसरामध्ये “राघु” आणि “चिऊ गल्ली” ची  भारणी करुन वातावरणात अधिकाधिक नैसर्गिकता आणली आहे.

अनेक दुर्मिळ आणि प्राचीन वस्तु गोळा करण्याचा छंद असलेल्या विठ्ठल कामतांनी “मुंबई” आणि “जाधवगड” येथे “आई” या संग्रहालयाची उभारणी सुद्धा केलेली आहे, या संग्रहालयात “टाकाऊ पासून टिकाऊ” वस्तुंचा समावेश असून पर्यावरणाला पुरक असा उपक्रम कामतांनी यशस्वी केला आहे.

विठ्ठल कामतांची “हॉटेल इंडस्ट्री” मधील कारकीर्द आणि “उद्योजक” म्हणून यशस्वी पणे वाटचाल केलेला प्रवास “उद्योजक होणारच मी” आणि “इडली ऑकिड आणि मी” या पुस्तकांमधुन वाचकांपर्यंत समोर आलेला ही दोन्ही पुस्तकं उद्योजक बनु इच्छिणार्‍या तरुणांसाठी, कॅटरिंग आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी नक्कीच प्रेरणादायक ठरतील अशीच आहेत.

विठ्ठल कामत हे “महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळा” चे अध्यक्ष असून, “हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया” च्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष आहेत; या व्यतिरिक्त अनेक शैक्षणिक, औद्योगिक समितींवर सल्लागार तसंच विविध पदांवर नियुक्त आहेत, त्यासोबतच “आय.आय.एम.” अहमदाबाद आणि इतर व्यावसायिक महाविद्यालयात ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं कार्य कामत करत आहेत.

आत्तापर्यंत विठ्ठल कामत यांना शंभरापेक्षा ही जास्त राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. यामध्ये “गोल्डन पिकॉक ॲ‍वॉर्ड”, “पाटवा इंटरनॅशनल अचिवर ॲ‍वॉर्ड”, “राजीव गांधी एन्वायर्मेंट ॲ‍वॉर्ड”, तर “ऑर्किड” साठी “इकोटेल” हा किताब मिळवण्याचा बहुमान विठ्ठल कामतांना जातो.

विठ्ठल कामत म्हणतात; “पर्यावरण माझी आवड” असून, वारसा हा माझा संप्रदाय, तर आदरातिथ्य करणं माझं जीवन आहे.“

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

2 Comments on विठ्ठल वेंकटेश कामत

  1. बाकि उद्योजक

    Laxmanrao Kirloskar – built the first industrial township in India, founder of Kirloskar Group
    Bhaskar Ganesh Chitale – Founder of Chitale Group
    Vikram Pandit – Former CEO Citi Group USA, previously Founded Old Lane Partners
    Vithal Kamat – Founder and Promoter of Kamat Hotels
    J. K . Parulkar – Founder of Sarswat Bank
    Suresh Haware – MD of Haware Engineers & Builders Pvt. Ltd.
    Satish Haware – Founder of Haware Engineers & Builders Pvt. Ltd.
    Sunil Mantri – MD of Mantri Developers
    Rajesh Patil – Chairman of Kolate Patil Developers
    Sudhir Moravekar – Chairman of Panoramic Group of Companies
    Vivek Ranadive – Founder & Chairman TIBCO Inc, USA (Silicon Valley)
    Dinesh Keskar – Chairman Boeing India
    Baba Kalyani – Founder & Chairman Bharat Forge
    Abasaheb Garware – Founder Garware group of industries
    Sanjay Kirloskar – Chairman and managing director – Kirloskar Group
    Rajdeep Sardesai – Co-promoter CNN-IBN, Founder Global Broadcast News
    Deepak Ghaisas – Chairman Gencoval Strategic Services Pvt Ltd & Former CEO I-flex
    Rajendra Pawar – Co-founder & Chairman NIIT Ltd
    Shankar Badve – Founder and Chairman of 10 billion Badve Group
    Prakash Patil – Founder and MD of USD 500 Million Aarati Drugs
    Prof. Nagesh Rane – Founder of IMS[disambiguation needed]
    B. G. Shirke – Founder of B.G. Shirke Construction Technology Group
    S.H. Kelkar – Founder of Kelkar group
    Virendra Mhaiskar – Chairman and MD of IRB Group
    Rajendra Pawar – Promoter and MD of Baramati Agro
    Vijay Samant – CEO and President Vical Inc.
    G.P. Dandekar – Founder of Camlin Ltd.
    Nanasaheb Bhogle – Founder of Nirlep
    K.V. Pendharkar – Founder of Vicco Laboratories
    V.P. Bedekar – Founder of Bedekar Pickles.
    Bhaskar Ganesh Chitale – Founder of Chitale Dairy Group
    Jayant and Jayraj Salgaonkar – Founders of Kalnirnay
    Vamanrao Prabhudesai – Founder of ‘Pitambari Group of Companies’
    Harsh Chitale – CEO, HCL Infosystems
    V. G. Rajadhyaksha – Chairman of Hindustan Unilever
    Nitin Paranjpe – CEO and managing director, Hindustan Unilever Ltd.[30]
    Dr. Shrinivas Thanedar – CEO, The Chemir Group
    Suhas Patil – Founder chairman Cirrus Logic Inc, USA (Silicon Valley)
    Sudha Kulkarni Murthy – First woman employee of Tata Motors and Founder of Sudha Murthy Foundation, wife of Narayan Murthy & sister of Shrinivas Kulkarni
    Girish Paranjpe – Former joint CEO, Wipro Limited
    Sunil Gaitonde – Founder of GS Labs, member of TiE board of directors
    Baburaoji Parkhe – Pioneer in Paper & Pulp Industry in Independent India, Writer and Philontrophist
    Kiran Karnik – Former president of NASSCOM for 2007–08
    Gururaj Deshpande – An Indian American businessman and co-founder and chairman of Sycamore Networks and chairman of A123 Systems
    Nitin Gadkari – Founder & Chairman PURTI GROUP
    Manohar Joshi – Founder & Chairman KOHINOOR GROUP
    Shivaji Adhalrao Patil – Founder & Chairman of Dynalog Group – Dynalog International, Semiconductors Junction Inc. (SJI)& Elmatronic Devices Inc.

    • Dear Santosh,

      Thanks for the list. We are including them on the site.

      Meanwhile if you have any more information about these people, please do let me know.

      Thanks and regards
      Ninad Pradhan

Leave a Reply

Your email address will not be published.


*