आत्मचरित्रकार आणि हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे अग्रणी म्हणून प्रसिद्ध असलेले स्वामी रामानंदतीर्थ तथा व्यंकटराव भवानराव खेडगीकर. स्वामी रामानंदतीर्थांचा जन्म १९०४ साली झाला.
प्रसिद्ध कामगार पुढारी ना. म. जोशी यांचे चिटणीस म्हणून त्यांनी काही वर्षे काम पाहिले. त्याकाळात स्वामी रामतीर्थांच्या वैचारिकतेचा प्रभाव त्यांच्या मनावर पडत गेला. आणि १९३२ साली त्यांनी स्वामी रामतीर्थांच्या शिष्यांकडून संन्यास दीक्षा घेतली. त्यानंतर एक संन्यासी म्हणून ‘स्वामी रामानंदतीर्थ’ हे नाव त्यांनी स्वीकारले.
हैद्राबाद मुक्तिसंग्रात त्यांचा सहभाग होता. १९३८ ला हैद्राबाद संस्थान काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले. लोकशाही लढ्याचे नेतृत्व करीत असताना त्यांना तुरुंगवासही घडला.
‘मेमॉसयर्स ऑफ हैद्राबाद फ्रीडम स्ट्रगल्स’ हे हैद्राबादच्या स्वातंत्र्याचा इतिहास सांगणारे त्यांचे आत्मवृत्त प्रकाशित झालेले आहे. त्याचे अनेक भाषेत अनुवादही झालेले आहे.
२२ जानेवारी १९७२ रोजी स्वामी रामानंदतीर्थ यांना देवाज्ञा झाली.
Leave a Reply