(9 मार्च 1899- 26 नोव्हेंबर 1985)
विख्यात मराठी कवी. संपूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढारकर. जन्म सातारा जिल्हयातील चाफळचा. शिक्षण सांगलीस झाले. मॅट्रिक झाल्यानंतर पुण्यास लेखनिकाची नोकरी केली.
कवी साधुदास (गोपाळ गोविंद मुजुमदार) हयांचे काव्यरचनेसंबंधीचे मार्गदर्शन आरंभीच्या काळात त्यांना मिळाले. यशवंतांची मूळ प्रवृत्ती राष्ट्रीय स्वरूपाची कविता लिहीण्याकडे होती. पुढे रविकिरण मंडळात ते आल्यानंतर इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. यशोधन (1929) हा त्यांचा पहिला मोठा आणि लोकप्रिय असा कवितासंग्रह.
त्यानंतरचे त्यांचे यशोगन्ध (1934), यशोनिधी (1941), शोगिरी(1944), ओजस्विनी (1946), इ. काव्यसंग्रह प्रसिदध झाले. गेय, भावोत्कट, सामान्यांच्या सुखदुःखाशी समरस होणारी, सहजसुगम अशी त्यांची कविता आहे. त्यामुळे रविकिरण मंडळातील सर्वांपेक्षा अधिक लोकप्रियता त्यांना मिळाली.
Leave a Reply