टेबल-टेनिस या क्रीडा प्रकारात ठाण्याचं नाव मोठं करणारे खेळाडू म्हणजे यतिन टिपणीस!
एम.सी.सी. महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केलेल्या यतिन यांनी वयाच्या १२ व्या वर्षापासूनच टेबलटेनिस खेळण्यास सुरुवात केली. गेली २३ वर्षांपासून ते ठाणे जिल्हा टेबलटेनिस असोसिएशनचे सचिव म्हणून कार्यभाग सांभाळत आहेत. त्याचप्रमाणे १२ वर्षांपासून महाराष्ट्र टेबलटेनिस असोसिएशनचे सह-सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. भारतीय टेबलटेनिस फेडरेशनच्या कार्यकारी समितीचे ते सदस्य आहेत. याबरोबरच त्यांनी आजवर ५ राज्यस्तरीय स्पर्धा, १५ राज्य गुणांकन स्पर्धा आणि ६ अखिल भारतीय गुणांकन स्पर्धा आणि आशियाई चषक स्पर्धांचं आयोजन केलं आहे.
आपल्या कारकीर्दीत आठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आणि अनेक राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्या आणि स्वत:चे व पर्यायाने ठाणे शहराचे नाव मोठे केले.
Leave a Reply