योगेश दामले हे महाराष्ट्रामधील परिचीत व सुप्रसिध्द पत्रकार असून त्यांनी पत्रकारितेशी व महाराष्ट्राच्या दुर्गम भागांमध्ये अतिशय हालाखीच्या परिस्थितीमध्ये गुजराण करणार्या आपल्या बांधवांशी दाखविलेली निष्ठा खरोखरीच स्पृहणीय आहे. असं म्हणतात की पत्रकारामध्येही एक समाजसेवक दडलेला असावा, व योगेश हे या अशा काही दुर्मिळ पत्रकारांच्या माळेमधील मणी आहेत, की ज्यांच्यातील झुंजार व तेजस्वी समाजसुधारक आपले दर्शन वारंवार इतरांना घडवित असतो. पत्रकारिता हा त्यांचा श्वास आहे व इतरांना जागृत करण्यासाठी चालविलेले व्रत आहे. सह्याद्रीच्या व भारतातल्या रांगड्या कडेकपारींमध्ये जावून तिथल्या आदिवासी संस्कृतींशी एकरूप होवून त्यांच्या जटील समस्या, अशा समस्या ज्या शहरी नागरिकांना त्यांच्या शहरांमधील समस्या खुज्या ठरवायला लावतील, उलगडुन दाखविणे हा त्यांचा उद्योग गेली कित्येक वर्षे निरंतरपणे चालु आहे. व्हिस्युअल एडिटींग, मजकुराचे स्क्रिप्टींग, विवीध प्रसारमार्गांद्वारे त्या मजकुराचे कौशल्यपुर्ण सादरीकरण, व अशा अनेक दृष्यफितींना अधिक प्रभावी व रंगतदार बनविणारा आवाज पुरविणे या अशा तांत्रिक जबाबदार्यांची पुर्तता ते एकहाती करू शकतात.ते सध्या ‘करसपॉन्डन्ट असिस्टन्ट आउटपुट एडिटर’ या हुद्यावर एन.डी.टी.व्ही. वाहिनीमध्ये काम करीत आहेत. याआधी ‘आज तक’ कडुन एन्टरनिंग रिपोर्टर म्हणुन काम करिताना त्यांनी त्यांच्या कर्तुत्वाची लहानशी झलक दाखवून दिली होती. सिमबॉयसिस इनस्टिट्युट ऑफ मिडीया अॅंड कम्युनिकेशन या पुण्यामधील नामांकित कॉलेजमधुन त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केले. सरस्वती भुवन व बाबासाहेब आंबेडकर मराठा युनिव्हर्सिटी या शिक्षण संस्थांमधून सुध्दा विज्ञान शाखेचे अद्ययावत प्रशिक्षण त्यांनी प्राप्त केले. सामाजिक, शहरी समस्यांना तोंड फोडणे, व राजकीय साचा व सामान्य जनतेमधील माहितीपर दुव्याचे काम करणे हे योगेश यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे काम आहे. प्रतिभावंत लेखन व मजकुराचे एडिटींग तेवढ्याच तन्मयतेने व सक्षमतेने करणारा हा विरळा पत्रकार आहे. योगेश यांच्या असामान्य कल्पनाशक्तीमुळे पंख फुटलेल्या, काही अर्ध्या तासांच्या दृष्यफिती टेलिव्हीजन विश्वातील मैलाचा दगड ठरलेल्या. या दृष्यफितींद्वारे भारतातल्या अनेक पारंपारिक संगीत, कला व चित्रपट या क्षेत्रांतील खजिन्यावर प्रकाश टाकण्यात आला होता. माय स्लीव्ह सारख्या छोट्या स्टोरीज कव्हर करण्यापासुन ते त्यांच्यापर्यंत विवीध स्त्रोतांमार्फत पोहोचलेल्या स्टोरींच नीट एडिटींग, सुसंस्कृत व सभ्य कॅमेरावर्क, व त्या स्टोरींची उत्कंठा शेवटपर्यंत टिकवुन ठेवण्यासाठी त्यातील घडामोडींच अनेक रोचक तुकड्यांमध्ये वर्गीकरण अशा कित्येक गोष्टी ते मनापासुन करतात.
Leave a Reply