MENU

पालक परोठा

साहित्य: १ जुडी पालक, पाने खुडून घ्यावीत. (बारीक चिरून साधारण २ ते अडीच कप), कणीक, ६-७ लसूण पाकळ्या ३-४ तिखट मिरच्या, १/४ टीस्पून हळद, १ टीस्पून जीरे, चवीपुरते मीठ, तेल. कृती: मिरची आणि लसणीच्या पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून […]

शेवयाचे लाडू

साहित्य : २०० ग्रॅमचे हातशेवयांचे एक पाकिट, दीड वाटी साखर, अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव, अर्धा कप सायीसकट दुध, १२-१५ बेदाणे, एक छोटा चमचा वेलची पूड,४-५ केशराच्या काड्या (दुधात खालून व शिजवून), दोन टेबलस्पून साजूक […]

अळशीचे (जवसाचे) लाडू

साहित्य:- एक वाटी अळशी (जवस),एक वाटी काळे तीळ,एक वाटी खसखस,३-४ टेबलस्पून डिंक पावडर,एक वाटी बदामाचे काप, दोन वाट्या कणीक, ३-४ वाट्या ताजा खवा, एक वाटी साजूक तूप, तीन वाट्या साखर. कृती:- गॅसवर एक कढई गरम […]

खजूर पनीर लाडू

साहित्य:- २०० ग्रॅम किसलेले पनीर, २०० ग्रॅम सिडलेस खजूर,दोन वाट्या पिठीसाखर,अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव, एक वाटी फ्रेश क्रीम, अर्धा चमचा वेलदोडा पावडर , अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट. कृती:- प्रथम खजूर चिरुन घेऊन मिक्सरमधुन बारीक […]

तांदळाचे लाडू

साहित्य:- चार वाट्या तांदूळ, दोन वाट्या बारीक चिरलेला गूळ, अर्धी वाटी तीळ, एकवाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी तूप, वेलदोडे पूड. कृती:- तांदूळ चांगले बदामी रंगावर भाजावेत, गरम असतानाच तांदूळ धुऊन पसरून वाळवावेत. वाळल्यावर दळून […]

लाडूच्या काही कृती

दिवाळीचा फराळ हा आहारपरंपरेचा परिपाक आहे. सणांचा संबंध खाद्यसंस्कृतीशीही आहे. मात्र खाण्यापिण्याची चंगळ असा त्याचा अर्थ नसून, ऋतूमधील वातावरणाला अनुरूप आणि त्या वातावरण बदलांमुळे शरीरामध्ये संभवणाऱ्या विकृतींना प्रतिबंधक असा आहार घेण्याचे मार्गदर्शन आरोग्यपरंपरेने केले आहे. […]

फणसाच्या आठळ्यांचे लाडू

साहित्य :- वाटीभर फणसाच्या आठळया , अर्धी वाटी साजूक तूप , वाटीभर साखर ,एक छोटा चमचा वेलदोडयाची पूड ,चिमूटभर जायफळाची पूड ,एक छोटा चमचा मीठ. कृती :- प्रथम फणसाच्या आठळया बत्याने फोडून घ्या व मिठाच्या […]

केशर श्रीखंड

साहित्य : ५०० ग्रॅम ताजे दही, ५० ग्रॅम पिठीसाखर, १० ते १५ धागे केशर, १ चमचा केशर भिजवण्यासाठी कोमट दूध, छोटी वेलची पावडर – ३ ते ४  वेलची , ५ ते ६ बारीक कापलेले पिस्ते, ५ ते ६ बारीक कापलेले बदाम. कृती : एका पातळ मलमलच्या कापडामध्ये ताजे दही बांधून २ ते ३ तास ठेवून द्या. हाताने दाबून दाबून दह्यातून पाणी पूर्णपणे काढून टाका. कोमट दूधामध्ये केशर घालून ते भिजवून घ्या. नंतर दही कापडामधून काढून एका भांड्यात काढून घ्या आणि त्यात साखर, वेलची पावडर घालून एकत्र करुन घ्या. दह्याच्या मिश्रणात केशराचे दूध घालून चांगल्या प्रकारे एकजीव करुन घ्या. त्यात बारीक केलेले बदाम आणि पिस्ते टाका. या मिश्रणाला दोन तास फ्रिज मध्ये ठेऊन द्या. तयार झालेले श्रीखंड वाटीत काढून त्यावर उरलेले बारीक केलेले बदाम आणि पिस्ते घालून सजवून घ्या. थंड केशर श्रीखंड सर्व्ह करा.

सॅन्डविच फुल ऑफ हेल्थ

साहित्य :  ५ ब्राऊन ब्रेड चे स्लाईसेझ, १ वाटी तूप, १ वाटी रवा, १/४ वाटी सिमला मिरची चे तुकडे, १/४ वाटी गाजराचे तुकडे, १/४ वाटी कणसाचे दाणे, १/२ चमचा मिरी पावडर, १/२ चमचा चिली फ्लेक्स, ५ चीज क्युब्ज, चवीनुसार मीठ. कृती : एक मोठी वाटी बटर पूर्णपणे फेटून घ्या. आता त्यात रवा आणि इतर भाज्या एकत्र करुन घ्या. आणि पंधरा मिनिटे तसेच ठेवा. आता ब्रेड स्लाइसवर हे मिश्रण लावून घ्या व त्यावर चीज किसून घ्या. आता नॉनस्टिक तव्याला गरम करुन त्यावर तूप घाला आणि ब्रेड चे स्लाइसेस त्यावर ठेवून द्या. आणि मंद आचेवर टोस्ट करुन घ्या. तयार झालेले हेल्दी सॅन्डविच टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

तड़का मिर्ची

साहित्य : २५० ग्रॅम हिरव्या मिरच्या, १ टेबलस्पून मोहरी, चवीनुसार मीठ, १ टीस्पून हळद पावडर, १ टेबलस्पून तेल, १/२ टीस्पून मोहरी, २ टेबलस्पून लिंबाचा रस. कृती : हिरव्या मिरच्या धुऊन त्या लांबसर चिरुन घ्या. कढईमध्ये तेल गरम करुन त्यात मोहरीची फोडणी द्या. नंतर त्यात हळद पावडर घालूनपरतून घ्या. मिरची, मोहरी आणि मीठ घालून मिरची पूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर ४ ते ५ मिनिटे शिजवून घ्या. त्यानंतर त्यावर लिंबाचा रस घालून गॅस बंद करा. आणि पराठ्याबरोबर सर्व्ह करा.

1 2