दहीवड्याच्या मिश्रणात हिंग आणि सुंठेची पूड घालावी यामुळे दहीवडे चविष्ट बनतात.
भोपळ्याच्या भाजीला वरून मेथी दाण्याचा तडका दिल्यानं भाजीला वेगळी चव येते.
कोणत्याही प्रकारचा पुलाव करताना त्यात थोडा लिंबाचा रस घालावा यामुळे पुलाव एकदम मोकळा होतो.
छोल्याची उसळ करताना त्यात थोडा का होईना पण गरम मसाला घालावा. छोले मस्त खमंग लागतात.
भटुऱ्याचं पीठ भिजवताना त्यात दही न विसरता घालावं. दही घातलं नाही तर भटुरे पुरीसारखे लागतात.
पालक, मेथी, यासारख्या पालेभाज्यांची चव त्यात घालणाऱ्या मिठावर अवलंबून असते. पालेभाज्यांची चव मिठामुळे बिघडू नये म्हणून भाजी शिजल्यावर गॅस बंद करण्याआधी त्यात मीठ घालावं.
Leave a Reply