साहित्य – १ कप शेवया, २ कप गरम पाणी, १/२ कप मटारचे दाणे, १-२ हिरव्या मिरच्या, किसलेलं बीट, किसलेलं गाजर, घेवडा, फ्लॉवर, सिमला मिरची, मक्याचे दाणे (आवडीनुसार भाज्या), चवीप्रमाणे मीठ, साखर, १ टेबलस्पून लिंबाचा रस, १ टेबलस्पून तेल, जिरे, मोहरी, हिंग.
कृती – तेल न घालता शेवया कढईत थोड्या लालसर रंगावर भाजून घ्याव्यात. त्या बाजूला काढून ठेवून त्याच कढईत तेल तापवून घ्यावे. त्यात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालावा. मोहरी थोडी तडतडली की त्यात उडीद डाळ घालून तांबूस रंगावर भाजू द्यावी. त्यातच मिरची घालावी. त्यावर मटारचे दाणे घालून बारीक गॅसवर २-३ मिनिटं परतावं. त्यावर भाजलेल्या शेवया घालाव्यात व २-३ मिनिटं परतावं. त्यात चवीप्रमाणे मीठ घालून वरून दीड कप गरम पाणी ओतावे. मिश्रण नीट हलवून झाकावे. शेवया शिजल्या नाहीत आणि पाणी आटले तर उरलेले पाणी घालून पुन्हा झाकून ठेवावे. शेवया जरा फुलल्यासारख्या वाटल्या की झाकण काढून ठेवावे. त्यावर लिंबाचा रस आणि साखर घालून नीट मिसळावे. उरलेले पाणी आटवून टाकावे. शेवया नीट शिजून मोकळी होण्यासाठी त्यात अर्धा चमचा साजूक तुपाची धार सोडावी, म्हणजे प्रत्येक शेवयी सुटी होते. आवडत असेल तर बारीक चिरलेला कांदा फोडणीत घातला तरी हरकत नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply