सांजा (शिरा)बनवण्याची कृती ः
अर्धी वाटी तूप घालून दोन वाट्या रवा चांगला भाजून घ्यावा. दुसऱ्या पातेल्यात तीन वाट्या पाणी उकळत ठेवावे.
पाणी उकळल्यावर दोन वाट्या चिरलेला गूळ घालून तो विरघळल्यावर त्यात वेलची पूड व भाजलेला रवा घालून शिऱ्याप्रमाणे शिजवून घ्यावे.
हा सांजा भरून पुरणपोळीप्रमाणे पोळी बनवावी. वरून साजूक तूप घालुन खायला द्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
सांजा पोळी चांगली केली तर मोतीया रंगाची होऊ शकते.
Leave a Reply