साहित्य: १/२ कप तुरीची डाळ, १/२ कप खवलेलं ओलं खोबरं, १ मुठ शेंगदाणे, १ हिरवी मिरची, ४-५ आमसुलं, २ मक्याची कणसं (अमेरिकन स्वीटकॉर्न), १ छोटा बटाटा, मध्यम चौकोनी फोडी करून, रताळ्याच्या ७-८ मध्यम चौकोनी फोडी, भोपळी मिरचीचे ७-८ चौकोनी तुकडे
काकडीच्या ७-८ मध्यम चौकोनी फोडी, मुळ्याच्या ५-६ चौकोनी मध्यम फोडी, ६-७ फरसबीचे , १” लाबीचे तुकडे, लाल भोपळ्याच्या ५-६ मध्यम आकाराच्या फोडी, दोडक्याच्या ५-६ मध्यम आकाराच्या फोडी, १/२ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, मीठ आणि साखर चवीप्रमाणे.
फोडणीसाठी- २ टेबलस्पून तेल, १/२ टीस्पून मोहरी, १/४ टीस्पून हिंग, ५-६ कढीपत्ता पाने.
कृती: कणसाचे २ १/२” ते ३” चे तुकडे करून घ्या. तुरीची डाळ, शेंगदाणे, कणसाचे तुकडे आणि १ हिरवी मिरची कुकरमध्ये एकत्र शिजवून घ्या.
पातेल्यात थोडे पाणी घाला. त्यात बाकीच्या सगळ्या भाज्या घाला आणि झाकण ठेवून शिजवून घ्या.
डाळ शिजली कि चांगली घोटून घ्या. त्यात वेगळ्या शिजवून घेतलेल्या भाज्या,कणसाचे तुकडे,शिजलेले शेंगदाणे घाला. पाणी घालून थोडं पात्तळ करून घ्या.
ओलं खोबरं गरम पाणी घालून बरीन वाटून घ्या. डाळ आणि भाज्यांमध्ये वाटलेलं खोबरं मिक्स करा. आमसुलं घालून ढवळा.
हळद,तिखट,मीठ साखर घालून ढवळून घ्या. रस्सा भाजी ५-१० मिनिटे चांगली उकळत ठेवा.
फोडणीच्या कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापले कि, मोहरी घाला. मोहरी तडतडली कि, कढीपत्ता पाने आणि हिंग घाला आणि रस्याला फोडणी द्या. खतखतं पोळी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply