साहित्य :-
साखर अर्धा किलो, पाणी पाऊण लिटर, सायट्रिक अॅसिड १५ ग्रॅम, प्रझर्व्हेशनसाठी सोडियम बेंझाइट लहान अर्धा चमचा, खाण्याचा केशरी रंग द्रव स्वरुपात पाच थेंब, केशर कांड्या एक ग्रॅम वजनाच्या, केशर इसेन्स चार थेंब.
कृती :-
मंदाग्नीवर जाड बुडाच्या भांड्यात साखर, पाणी एकत्र करुन ठेवा. हालवत रहा. साखर विरघळून घ्या. मग त्यात सायट्रिक अॅसिड टाका आणि मिसळून घ्या. ते पूर्ण विरघळल्यावर हे मिश्रण स्वच्छ फडक्याने गाळून घ्या. या मिश्रणातील थोडे मिश्रण घेऊन कपात घेऊन त्यात प्रिझर्व्हेटिव्ह घालून ढवळून घ्या आणि शुगर सिरपमध्ये घाला. चांगले मिसळा व बाटल्यात भरून ठेवा. हवे तसे, हवे तेव्हा वापरा.
Leave a Reply