साहित्य- दोन वाट्या बेसन, तिखट, मीठ, हिंगपूड, अर्धा चमचा ओवा, एक चमचा धने-जिरेपूड, एक वाटी बारीक चिरलेली मेथी, एक पिकलेले केळे, चिमूटभर खायचा सोडा.
कृती – नेहमी भज्यासाठी कालवतो त्याप्रमाणे बेसन, तिखट, मीठ, हिंगपूड घालून कालवून घ्यावे.
त्यात अर्धा चमचा ओवा, धने-जिरे पूड व बारीक चिरलेली मेथी मिसळावी. चिमूटभर खायचा सोडा घालावा. मेथीचा कडवटपणा कमी करण्यासाठी व थोडा वेगळा स्वाद येण्यासाठी एक पिकलेले केळे कुस्करून घालावे. नंतर नेहमीप्रमाणे भजी तळावीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply