मेथी पास्ता

साहित्य- एक जुडी मेथीची पाने धुवून बारीक चिरून, एक वाटी उकडलेले मक्या चे दाणे, एक वाटी मॅकरोनी शिजवून

व्हाईट सॉससाठी:- लोणी, एक छोटा कांदा, दोन मोठे चमचे मैदा, दोन ते अडीच कप दूध, कपभर किसलेले चीज, मीठ, मिरे, दोन चमचे टोमॅटो सॉस.

कृती:- लोण्यामध्ये बारीक चिरलेली मेथी परतून घ्यावी, त्यात उकडलेले मक्यामचे दाणे व मीठ मिरेपूड घालून ठेवावी. एक वाटी मॅकरोनी उकडून घ्यावी. व्हाईट सॉस बनवण्यासाठी पॅनमध्ये थोडे लोणी घालून त्यावर बारीक चिरलेला एक कांदा परतून घ्यावा. त्यात मैदा घालून थोडा परतावा व नंतर हळूहळू दूध घालत गाठी होऊन देता सतत ढवळत हा सॉस बनवावा. मीठ, मिरेपूड, अर्धे चीज व मॅकरोनी त्यात मिसळा. ओव्हनमध्ये ठेवण्याच्या डिशमध्ये मॅकरोनी व्हाईट सॉसचा एक थर लावावा.

त्यावर मेथी-मक्या च्या दाण्याचा थर घालावा व शेवटी पुन्हा मॅकरोनीचा थर घ्यावा. वरून उरलेले चीज पसरून ओव्हनमध्ये २० मिनिटे बेक करून घ्यावे. वरून सजावटीसाठी थोडा टोमॅटो सॉस घालावा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*