प्रथम तांदूळ धुवून पाण्यात ठेवावेत. लवंग, दालचिनी, मिरे, जायपत्री व वेलची यांची पावडर बनवून बाजूला ठेवावी. तसेच लसूण, मीठ, लाल मिरची, हिरवी मिरची, लवंग, दालचिनी, जिरे पावडर आणि धणे पावडर यांनी पेस्ट बनवावी. एका पातेलीत चिरलेल्या सुरणाचे तुकडे, ही पेस्ट आणि लिंबाचा रस असे एकत्र करून आता बाजूला ठेवावे. बटाट्याच्या मोठ्या फोडी ब्लांच कराव्यात. पातेलीत तेल तापवून त्यावर त्या फोडी टाकाव्यात. त्यातच उभा चिरलेला कांदा परतावा. मीठ मिसळून हे बाजुला ठेवावे. दुसर्याा पातेलीत बारीक चिरलेला कांदा परतावा व त्यावर बारीक चिरलेला टोमॅटोही ढवळावा. त्यात मीठ व सुरणाचे तुकडे मिक्स करून ढवळावेत. एका पातेलीत तांदूळ फडफडीत शिजवावा. शिजतांना त्यात मीठ घालावे व ढवळावे. आता मोठ्या पातेलीत तुप तापवून त्यावर एक थर भाताचा त्यावर दुसरा थर बटाट्याचा व तिसरा थर सुरणाचा असे लावत जावे. बाजुने तुप सोडून पातेले मंदाग्निवर ठेवावे व वाफ द्यावी. सुरण बिर्याणी तयार! आवडत असेल तर या थरांमध्ये रंग घालावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply