साहित्य: 2 कप उकळलेले स्वीट कार्न, 7 किसून घेतलेले चीज क्यूब, 3 मध्यम आकाराचे उकळून कुस्करून घेतलेले बटाटे, 1 मध्यम आकाराची बारीक कापलेली सिमला मिरची, 1 मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा, 2 चमचे कॉर्न फ्लोअर, 3 चमचे मैदा, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा ऑरगेनो, 1 चमचा मीरे पूड, 3 ते 4 चमचे ब्रेडचा चुरा, 1 चमचा बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
कृती : सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करावं. मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे तयार करून घ्यावेत. तयार केलेले गोळे गरम तेलात सोनेरी होईर्पयत तळून घ्यावेत. हे गोळे टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणीसोबत गरम गरम खाता येतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply