वॉन्टॉन सूप

सारणासाठी साहित्य :

२०० ग्रॅम चिकन खिमा
३ पातीचे कांदे (बारीक चिरलेले)
१ टी स्पून आले-लसूण पेस्ट
१ अंडे ( थोडे फेटून घेतलेले )
६-७ कप चिकन स्टॉक
१ टेबलस्पून सोयासॉस
तेल, मीठ, मिरे पावडर, कोथिंबीर

वॉन्टॉन पारीसाठी साहित्य:

३ टेबलस्पून मैदा
१ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
पाव टी स्पून बेकिंग पावडर
थोडे मीठ

कृती:

प्रथम वॉन्टॉनच्या पारीचे सर्व साहित्य एकत्र करा. त्यात थोडे पाणी घालून गोळा मळून तयार करा व झाकून ठेवा. मधल्या सारणासाठी चिकन खिमा, पातीचा कांदा थोडयाशा तेलावर परतून घ्या. त्यात मीठ व अर्धा टी स्पून आले-लसूण पेस्ट घाला व वाफेवर शिजवून घ्या. हे सारण कोरडे राहिले पाहिजे. वॉन्टॉन करण्यासाठी मळलेल्या पीठाचे छोटे छोटे गोळे करा व चौकोनी आकारात पारी लाटा. या प्रत्येक पारीवर खिम्याचे सारण घाला. पारीच्या कडेला फेटलेले अंडे लावून त्रिकोणी आकारात त्याची टोके जुळवून चिकटवा. अशा प्रकारे सर्व वॉन्टॉन तयार करा. सारण कमी घाला व कडा जास्त दिसतील असे वॉन्टॉन करा.

सूप तयार करण्यासाठी चिकन स्टॉक उकळत ठेवावा. त्यात उरलेले आले-लसूण पेस्ट घाला. उकळी आल्यावर त्यांत सर्व वॉन्टॉन्स टाकून नंतर सोयासॉस, मीठ, काळेमिरे घालावे. ५-१० मिनिटे उकळी येऊ द्यावी. सर्व वॉन्टॉन्स शिजून वर यायला लागल्यानंतर गॅस बंद करावा. बाऊलमधून हे गरमागरम सूप सर्व्ह करताना वरून कोथिंबीर व चिरलेली पात घालावी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*