साहित्य: दोन कप कट, पाऊण कप शिजलेले पुरण, २ टेबलस्पून चिंचेचा कोळ, अर्धा कप खोवलेला नारळ (मिक्सपरमध्ये बारीक वाटून घ्यावे) १ टेबलस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टेबलस्पून गरम मसाला, अर्धा टेबलस्पून गोडा मसाला, कोथिंबीर, मीठ चवीने.
फोडणीसाठी. १ टेबलस्पून तेल, १ टी स्पून मोहरी, १ टी स्पून जिरे, पाव टी स्पून मेथी दाणे, पाव टी स्पून धने, पाव टी स्पून हिंग, पाव टी स्पून हळद, ७-८ कडीपत्ता पाने.
कृती: डाळीचा कट, चिंचेचा कोळ, लाल मिरची पावडर, गरम मसाला, गोडा मसाला, वाटलेला नारळ, मीठ घालून शिजत ठेवावे मग त्यामध्ये शिजलेले पुरण घालून थोडे पाणी घालून परत आमटीला चांगली उकळी आणावी. फोडणीच्या कढईत तेल गरम करून फोडणी करून खमंग फोडणी आमटीत घालून मग मिक्सा करावी. ही आमटी थोडी पातळच करावी. कारण की ही आमटी थंड व्हायला लागली की घट्ट होत जाते. कारण यामध्ये पुरण घातले आहे. गरम गरम आमटी पुरणपोळीबरोबर व भाताबरोबर सर्व्ह करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply