साहित्य:- जाड बुटके पाचशे ग्रॅम भडंग चुरमुरे, दोन वाटी उभा चिरलेला (पातळ) कांदा, लसूण एक टेबल स्पून बारीक चिरलेला (आवडीनुसार), लाल तिखट, पिठीसाखर, मीठ चवीनुसार, शेंगदाणे एक वाटी, मेतकूट दोन टेबल स्पून, कढीपत्ता, लिंबाचा रस अर्धा टेबल स्पून.
फोडणी साहित्य:- मोहरी, हळद, धने-जिरेपूड एक टेबलस्पून, तेल.
कृती:- प्रथम उन्हात भडंग चुरमुरे तापवून चाळून घ्यावेत. मोठ्या पातेल्यात किंवा कढईत तेल तापवून कांदा सोनेरी रंगावर तळून घ्यावा. त्याच तेलात लसूण तळून घ्यावा. बाजूला काढून ठेवावा. शेंगदाणे तळून निथळून घ्यावेत. उरलेल्या तेलात मोहरी, हळद, कढीपत्ता घाला. लसूण, कांदा घालावा. लिंबाचा रस घालावा. एक मिनिटाने तिखट, मीठ, पिठीसाखर भडंग घालून परतावे. मिश्रण व्यवस्थित मिक्सन करावे. गॅस बंद करून खाली उतरवावे. नंतर मेतकूट घाला, परत मिक्से करावा. गार झाला, की हवाबंद डब्यात भरा. तिखट, आंबटगोड, मसालेदार भडंग तयार.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply