साहित्य:- १ स्लाइस्ड ब्रेड, अडीच वाटी साखर, तळण्यासाठी तूप, 1 वाटी खवा, दीड कप दूध, केशर, वेलची पूड, सुकामेवा.
कृती:- ब्रेडच्या स्लाइसच्या कडा काढून एका ब्रेडचे चार तुकडे करावेत. सर्व तुकडे तुपात तळून घ्यावेत. अडीच वाट्या साखर बुडेल एवढे पाणी घेऊन दोन तारी पाक करून घ्यावा. खवा परतून घ्यावा. तळलेले ब्रेडचे तुकडे खोलगट डिशमध्ये ठेवून त्यावर दूध शिंपडावे. सर्व तुकडे दुधात नीट भिजले पाहिजेत. साखरेच्या पाकात वेलदोडा पूड व केशर घालून तो पाक दुधात भिजलेल्या ब्रेडच्या तुकड्यांवर ओतावा. त्यावर परतून ठेवलेला खवा पसरावा. तो पाकात जिरतो. काहीजण हे मिश्रण पुन्हा शिजवून घेतात व नंतर डिशमध्ये मांडतात.) शेवटी काजू – बदाम – पिस्ते – अक्रोडाचे काप पसरून चांदीच्या वर्खाने सजवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply