साहित्य –
एक वाटी खसखस, १५ ते १६ खारका, एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, २० बदाम, ५० ग्रॅम अक्रोडाचा चुरा, एक वाटी सायीसकट दूध, दोन वाट्या साखर, थोडी पिठीसाखर, चंदेरी गोळ्या व तूप.
कृती –
खसखस, खारका व बदाम वेगवेगळ्या भिजत घालावे. साधारण तीन तासांनी खसखस गाळण्यावर ओतून पाणी निथळावे. खारकेतील बिया काढून तुकडे करावे. बदामाची साले काढून तुकडे करावे. नंतर खसखस व थोडे दूध एकत्र करून मिक्सरच्या छोट्या भांड्यात वाटून घ्यावे. खारका व बदामाचे तुकडे थोडे दूध घालून वेगवेगळे वाटून घ्यावे. अक्रोडाचा चुरा व खोबरे कीस मिक्सरवर वाटून घ्यावा.नंतर पिठी साखर व चंदेरी गोळ्याखेरीज इतर सर्व एकत्र करून गॅसवर ठेवावे. सतत हलवत राहावे. मिश्रण घट्ट झाल्यावर कडेने थोडे तूप सोडावे व गॅसवरून उतरवावे. जरुरीप्रमाणे थोडी पिठी साखर घालावी.
छोट्या मोदकाच्या साच्याला पातळ तुपाचा हात फिरवून त्यात वरील मिश्रण थोडे थोडे घालून मोदक करावे. प्रत्येक मोदकावर एकेक चंदेरी गोळी लावावी.
— संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
छायाचित्र : इंटरनेटवरुन
Leave a Reply