साहित्य: बारीक चिरलिली मेथीची पाने: २ कपबारीक चिरलेली कोथिंबीर: १/२ कपगव्हाचे पीठ: २ कपतांदळाचे पीठ: १/२ कपहिरवी मिरची, आले , लसूण पेस्ट: चवीनुसारदही: १ टेबल स्पूनओवा: १ टी स्पूनहळदचवीनुसार मीठतेल किंवा तूप.
कृती: मेथीच्या पाने आणि थोडे मीठ एकत्र हलवून १० मिनिटे बाजूला ठेवा.नंतर त्यामधे बाकीचे साहित्य घालून चांगले एकत्र हलवा. त्यामधे थोडे पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्या. शेवटी थोडे तेल घालून मळून घ्या आणि हे कणीक अर्धा तास तरी बाजूला तसेच ठेवा.नंतर त्या कणीक चे छोटे छोटे गोळे करून ठेवा. गॅस वर एक तवा गरम करायला ठेवा. प्रत्येक गोळ्या चे पराठे लाटा. हा पराठा दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्या. पराठा भाजताना थोडे तूप किंवा तेल लावा.हा गरमागरम पराठा कोणत्याही चटणी किंवा लोणचे किंवा दही बरोबर छान लागतो.
Leave a Reply