भरलेल्या मिरच्या

साहित्य :- छोटी सिमला मिरची पाव किलो, हरभरा डाळीचं पीठ एक वाटी, दीड चमचा ओवा, भरपूर कोथिंबीर, पाव वाटी तेल,मोहरी , हिंग , हळद , तिखट , चवीपुरतं मीठ .

कृती :- १) सिमला मिरच्या धुवून त्या निथळल्यावर त्याच्या समोरच्या मोठया पसरट भागावर + असा छेद घ्यावा .

२) आतल्या बिया काढून टाकाव्यात . कढईत दोन मोठे चमचे तेल तापवून त्यात एक वाटी डाळीचं पीठ खमंग भाजून घ्यावं .

३) ते थोडसं गार होऊ द्यावं . नंतर त्यात हळद , तिखट , मीठ ओवा , कोथिंबीर घालावी व हे सारण मिरचीत भरावं .

४) कढई , प्रेशरपैन किंवा पसरट भांड्यात उरलेलं तेल टाकून फोडणी करावी .

५) त्यात मिरचीची भरलेली बाजू वरती असेल व देठाकडील बाजू खाली असेल अशा पद्धतीनं मिरच्या रचाव्यात आणि न हलवता मंद आचेवर भांड्यावर झाकण ठेवून व झाकणावर पाणी घालून शिजू द्याव्यात .

६) प्रेशर पैनमध्ये ही भाजी करताना पाणी अजिबात घालू नये . मंद आचेवर पाच मिनिटात भाजी शिजवावी .

७) झाकण ठेवल्यास उरलेल्या उष्णतेवर भाजी व्यवस्थित शिजते .

८) पश्चिम महाराष्ट्रात ही भाजी करताना मिरच्यांचे दोन तुकडे करतात . बटाटा वड्यासारखं बटाट्याचं सारण त्यात भरतात . दोन्ही पद्धतीच्या भाज्या चविष्ट लागतात .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*