साहित्य :- एक कप उकडलेले बेबी कॉर्न, एक मोठा कांदा, दोन टोमॅटो, मीठ चवीनुसार, दोन चमचे तेल, एक मोठा चमचा क्रीम, थोडेसे आले व लसूण, 3-4 हिरव्या मिरच्या, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड, कोथिंबीर.
कृती :- कांदा, आले व लसूण वाटून तेलात परतून घ्या. त्यात टोमॅटोपेस्ट, मीठ, हळद, लाल तिखट व धनेपूड मिसळून व्यवस्थित परतून घ्या. यात बेबी कॉर्न व एक कप पाणी घालून उकळा व पाच मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. नंतर गरम मसाला, उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या व कोथिंबीर मिसळा. क्रीमने सजवून खाण्यास द्या.
— संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply