अळीव म्हणजे थंडीतला खुराक आणि बाळंतिणीचं खाणं हे समीकरण आपल्याला माहीत आहे. लोहाने समृद्ध असलेल्या अळिवात कॅल्शियम, बीटा कॅरोटिन आणि प्रथिनंही असतात. त्यामुळे स्तनपान देणाऱ्या मातांना ते उपयुक्त आहेच शिवाय मासिक पाळी नियमित करण्यासाठीही अळिवाचा उपयोग होतो. मात्र गर्भवती स्त्रियांनी अळीव खाऊ नये. अळिवाला कीड लागत नाही. याशिवाय अळिवाच्या सेवनाने प्रतिकारशक्ती वाढते, आव पडणे आणि मलावरोध दोन्हींसाठी याचा उपयोग होतो. अळीवाच्या नाजुक पानात जीवनसत्व ‘अ’ आणि ‘क’ आहे. ही पानं कच्ची सॅलडमध्ये घालून खाल्ली तरी चालतात. अळीव पौष्टिक असल्याने बाळंतिणीच्या तब्बेतीसाठी उत्तम असतात. प्रसुतीनंतर कंबरदुखीवर अळीव गुणकारक आहे, तसेच पचनक्रिया सुधारते. बलवर्धक असल्याने अशक्तपणासाठी अळीव खाल्लेला चालतो. अळीव उष्ण असल्याने गरोदरपणात शक्यतो खाऊ नये.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
अळीवाचे काही पदार्थ
अळीव पराठा
अळीवाची खीर
अळीवाचे लाडू
वरी आणि अळिवाची खांडवी
अळीवाचे पॅनकेक
Leave a Reply