आजचा विषय चहा

पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा… भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांगला देश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. चहाचा शोध नेमका कुठल्या देशात लागला हे सांगणं कठीण असलं तरी चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते. चहाला जगभर पार्टीचं स्वरूप आलेले आहे. चीनमध्ये ‘गॉमफाय’ टी सेरीमनी असते. मुद्दाम मातीच्या भांडय़ात चहा देतात. त्याला थिक्सिंग टी पॉट म्हणतात. आजही आपल्या वधू- वर संशोधनाच्या वेळेस वाफाळलेला चहा आणि पोहे पार्टी असते. जपानमध्ये चहा सादर करणे ही कला आहे. आज जागतिक चहा दिनाच्या निमित्तानं जगभरातील टी आणि कॉफी हाऊसेसमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते.

चहा हे थंड पेयदेखील आहे. थंड चहाचे पण अनेक प्रकार आहेत. लेमन, ऑरेंज, पायनापल, स्ट्रॉबेरी, विडय़ाच्या पानांचा रस घालून थंड चहा करता येतो. ग्रीन टी हे आजकाल हेल्थ ड्रिंक म्हणून खूप प्रसिद्ध झालं आहे. ग्रीन टी हे एक नैसर्गिक फॅट बर्नर असून त्यात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात.

चहाची कथा
चहाबद्दल असे सांगितले जाते की पाच हजार वर्षांपूर्वी ‘शेननंग’ नावाचा चिनी राजा होऊन गेला. तो प्रयोगशील, दूरदृष्टी असलेला, कलेचा भोक्ता होता. त्या राजाच्या राज्याचा विस्तार खूप मोठा होता. आपल्या राज्यातील दूरच्या ठिकाणी जाऊन प्रजेची हालहवाल विचारावी म्हणून त्याच्या लवाजम्यासकट निघाला. एके ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले. राजाने नोकरांना पाणी उकळण्यास सांगितले. पाणी उकळायला ठेवले त्या वेळेस काही वाळलेली पाने उकळत्या पाण्यात पडली. पाणी करडय़ा रंगाचे झाले. राजा संशोधनवृत्तीचा असल्यामुळे तो ते पाणी प्यायला. त्याला खूप तरतरी आली. हाच जगातील पहिला चहा आहे असे मानले जाते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

काही चहा करण्याचे प्रकार
मोगली चहा
साहित्य : चार कप पाणी, चार चमचे साखर, चार चमचे चहा पावडर, एक कप दूध, जायफळ, जायपत्री, वेलदोडा लवंग केशर ह्यंची पूड प्रत्येकी पाच चमचा.
कृती:- पाणी आणि साखर उकळवून घ्यावे. त्यात सर्व पुडी टाकण्यात पुन्हा एक मिनिट उकळावे. त्यानंतर चहापूड टाकून तीन मिनिटे झाकून ठेवावे. गाळून घ्यावा. गरम प्यावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

काश्मिरी काहवा
साहित्य : चार कप पाणी, चार चमचे साखर, चार चमचे चहा, दहा-बारा बदामांचे काप, पाव चमचा केशर.
कृती : पाणी साखर उकळावे. त्यात चहा टाकावा. तीन मिनिटे झाकून ठेवावा. त्यानंर गाळून त्यात बदामाचे काप आणि केशर टाकावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मसाला चहा
चहाचा मसाला
साहित्य : ५० ग्रॅम, सुंठपूड, लवंग, वेलदोडे, जायफळ, दालचिनी, काळीमिरी, बडिशेप ह्यांची पूड प्रत्येकी एक चहाचा चमचा.
कृती : सर्व पुडी एकत्र करून झाकणाच्या बरणीत ठेवावा.
मसाला चहा कृती : चार कप पाणी, चार चमचे साखर, चार चमचे चहापूड, एक चमचा चहाचा मसाला, एक कप दूध. पाणी आणि साखर उकळून घ्यावे. एक चमचा टाकून पुन्हा उकळावे. त्यानंतर चहा पूड टाकून तीन मिनिटे झाकून ठेवावा. त्यानंतर गाळून गरम दूध टाकून गरमच प्यावा. थंडीत, पावसाळ्यात हा चहा रोज प्यावा. अतिशय गुणकारी आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

थंड चहाची बेसिक कृती
चहाची बेसिक कृती – चार ग्लास पाणी, तीन चमचे चहाची पूड, चार चमचे साखर, पाणी, साखर उकळून घ्यावे. त्यात चहा पूड टाकावी. (हा चहा जास्त स्ट्राँग करू नये.) तीन मिनिटांनी गाळून घ्यावा. गार झाल्यावर आवडीप्रमाणे संत्रे, अननस, मोसंबी किंवा स्ट्रॉबेरी ह्यंचा रस एक कप घालावा. फ्रिजमध्ये थंड करावा. दोन तासांनी प्यावा.
विडय़ाच्या पानांच्या रसाचा चहा करावयाचा असल्यास प्रथम बेसिक चहा करताना पाणी साखर उकळवावे. त्यानंतर त्यात लवंग, जायफळ, वेलदोडे पूड प्रत्येकी अर्धा चमचा टाकावी. त्यानंतर गुलकंद, गुंजेचा पाला टाकून एक मिनिट उकळावे. त्यानंतर चहा पूड टाकून झाकून ठेवावे. चहा गाळून गार होऊ द्यावा. विडय़ाच्या दहा पानांत दीड कप पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून पाणी गाळून घ्यावे. हे पाणी चहात टाकावे. फ्रिजमध्ये दोन तास गार करण्यास ठेवावे.
‘लेमन’ टी करताना वर सांगितलेल्या चार ग्लास बेसिक चहात गार झाल्यावर एका लिंबाचा रस टाकावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

पीच टी
साहित्य: चार जरदाळू, चार ग्लास पाणी, चार चमचे चहा, चार चमचे साखर
कृती: प्रथम जरदाळू दोन तास, एक कप पाण्यात भिजत घालावेत. बिया काढून मिक्सरमध्ये वाटून रस काढावा. चार ग्लास पाणी, साखर उकळावे. त्यात चहा पूड टाकून गाळून घ्यावे. गार झाल्यावर जरदाळूचा रस टाकावा. दोन तास फ्रिजमध्ये ठेवून गार करून प्यावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*