साहित्य:
१ वाटी जाड रवा
२ ते ३ वाटी पाणी
२ ते ३ मिरच्या
१ कांदा
४ ते ५ कडीपत्त्याची पाने
फोडणीसाठी: ३ ते ४ चमचे तेल, मोहोरी, हिंग, हळद, चवीपुरते मीठ
अर्धा चमचा साखर
लिंबाचा रस
धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर
खोवलेला नारळ
कृती:
प्रथम रवा चांगला भाजून घ्यावा.
एका कढईत तेल तापवत ठेवावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद, कडीपत्ता, मिरचीचे तुकडे घालून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. १ लहान चमचा मीठ घालावे व कांदा चांगला शिजू द्यावा. कांदा नीट शिजला की त्यात रवा घालावा.
दुसर्या भांड्यात पाणी तापवत ठेवावे. रवा थोडावेळ कांद्याबरोबर परतावा. पाणी उकळले की भाजलेल्या रव्यात ओतावे. नीट मिक्स करावे. त्यात साखर व आवश्यकतेनुसार मीठ घालावे. एक वाफ काढावी.
अशाप्रकारे तिखट मीठाचा सांजा तयार. यावर सजावटीसाठी आपण कोथिंबीर व खोवलेला नारळ घालू शकतो.
Leave a Reply