भारतात महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूत शेवग्याची शेती केली जाते. आयुर्वेदिक दृष्ट्या शेवग्याची पाने ही औषधी असुन यामध्ये अ ब क हि जिवनसत्वे, लोह, कँल्शीअम यासारखी खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. पानांची पावडरची प्रक्रिया करून पदार्थ साध्या पद्धतीने बनविता येतात, असुन त्याला जगभरात मोठी मागणी आहे. पानांच्या पावडरचा उपयोग कुपोषण थांबविण्यासाठी पोषक आहार केले जाते. ‘तोंड येणे’ या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन लाभदायक आहे. शेवग्याची मुळे जंतनाशक असतात. शेवग्याच्या पान गळ्याची सुज, खरूज, वांती यावर उपयुक्त ठरते. जखमेवर पानाचा लगदा बांधाल्यास आराम पडतो. पानांचा रस काढून त्यामध्ये मध घालून अंजन केले असता डोळ्याचे रोग बरे होतात. कोवळ्या पानांच्या रसात मिरे घालून कपाळावर लेप दिल्याने डोके दुखी थांबते केसातील कोंड्यावर पानांच्या रसाने मालिश करावे. पिसाळलेले जनावर चावल्यास कोवळ्या पानांचा रस, मीठ, काळी मिरी, लसूण, हळद यांचे एकत्र मिश्रण पोटात देऊन जखमेवर लेप लावतात. शेवग्याचा पाला काहीसा तुरट-कडवट चवीचा असतो. पण भाजी केल्यावर चांगली लागते. सर्व प्रकारच्या वात विकारावर शेवग्याची पालेभाजी पथ्यकर व उपयुक्त आहे. बरेच दिवसाच्या तापातून उठल्यावर भूक पूर्ववत व्हावी म्हणून ही भाजी खावी. जेवल्यावर धाप लागणे, पोटात गँस धरणे, डोकेदुखी, डोळ्यांचे विकार यात या भाजीचा विशेष उपयोग होतो. शेवग्याच्या पानाचे पोषणमूल्य केवळ अनन्यसाधारण असेच आहे. त्यामध्ये दुधापेक्षा चौपट जास्त कॅल्शियम आहे. सहा-सात संत्र्यामध्ये असते तितके “क” जीवनसत्त्व आणि तीन केळ्यांमध्ये असते तेवढे पोटॅशियम असते. त्याच बरोबर लोह आणि प्रथिने असतात ती वेगळीच. त्याशिवाय महत्त्वाची ग्लुकोसाइससारखी औषधी द्रव्ये आणि जंतूनाशक गुणधर्म त्यामध्ये आहेत. त्याचा उपयोग मधुमेह आणि उच्च रक्तदाब अशा रोगांवरील उपचारासाठी केला जातो. सर्व प्रकारच्या वात विकारावर शेवग्याची पालेभाजी पथ्यकर व उपयुक्त आहे. जेवल्यावर धाप लागणे, पोटात गँस धरणे, डोकेदुखी, डोळ्यांचे विकार यात या भाजीचा विशेष उपयोग होतो. शेवग्याच्या पानातील प्रथिने पाचक असतात. मुख्यतः भात खाणार्याच लोकांनी शेवग्याच्या पानांची भाजी करून खावी. वायुगोळयावर शेवग्याच्या पाल्याचा रस खडीसाखरेबरोबर घ्यावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काही पदार्थ शेवग्याच्या पानांचे
शेवग्याच्या पानांची भाजी
साहित्य:- शेवग्याची कोवळी पाने (साधारण एक जुडी होईल एवढा पाला), मुगाची डाळ अर्धी वाटी, कांदा एक, हिरव्या मिरच्या तीन-चार, लसूण पाकळ्या चार-पाच, तेल, चवीपुरतं मीठ, हिंग फोडणी साठी, ओलं खोबरं.
कृति:- मुग डाळ एक तास आधी धुवून भिजत ठेवावी व नंतर निथळून घ्यावी. शेवग्याची कोवळी पाने निवडून स्वच्छ धुवून घ्यावीत. नंतर बारीक चिरावित. एका कढईत तेल घेउन त्यात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. कांदा बारीक चिरून फोडणीत घालावा व परतून घ्यावा. नंतर लसूण पाकळ्या, मिरची घालून परताव्यात. ते खमंग परतल्यावर त्यात डाळ घालावी व डाळ जराशी परतल्यावर त्यात चिरलेली भाजी घालावी मीठ घालून झाकण ठेवून मोकळी शिजू दयावी .
झाकण ठेवून वाफेवर शिजवावी. जरूर पडल्यासच पाणी घालावे. एक वाफ येउन गेल्यावर चविनूसार मीठ घालावे व पुन्हा परतून झाकण ठेवावे.. भाजी पूर्ण शिजल्यावर ओले खोबरे घालावे व भाजी गँसवरून उतरवून घ्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply