साहित्य :- अर्धा कप प्रत्येकी तूप व पिठीसाखर, एक कप रवाळ कणीक, अर्धा चमचा बेकिंग पावडर, मसाला, वेलदोड्याचे दाणे जाडसर कुटून.
कृती :- तूप, साखर फेसावे. कणीक, बेकिंग पावडर चाळून मिसळावे. थोडं दूध वापरून हलक्याल हाताने, लाटून गोल किंवा चौकोनी कापावे. (लाटतानाच वेलदोड्याची पूड पेरा. म्हणजे नीट चिकटेल.) दहा-बारा मिनिटं मध्यम ओव्हनवर भाजावं. काश्मिूरी डोढा बर्फी साहित्य :- 1 कप कणीक, दीड कप खवा, दीड कप साखर, पाऊण कप दूध, पाऊण कप तूप, केशर, ड्रायफ्रूड, चिरून वर्ख इ. कृती :- तुपावर कणीक भाजावी. गार झाल्यावर दुधात कालवावी. खवा निराळा खमंग भाजावा. नॉनस्टिक पॅनमध्ये साखर, दुधाचं मिश्रण, खवा घालून ड्रायफ्रूट, केशर घालून घट्ट करावं. बर्फीच्या ट्रेमध्ये थापावं. वर्ख करावा. या बर्फीचा रंग ब्राऊन यायला हवा. चिमूट कोको पावडर घातली तर रंग सुंदर येईल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply