कडधान्ये म्हटले, की पहिल्यांदा आठवतात त्या उसळी. उसळीं व्यतिरिक्तही कडधान्यांचे अत्यंत चवदार पदार्थ घरी बनवता येतात. मोड आणलेली कडधान्ये म्हणजे भरपूर प्रथिने. आरोग्याच्या दृष्टीनेही आठवड्यातून दोन-तीन वेळा तरी कडधान्यांचे पदार्थ खावेत, असे सांगितले जाते. विशेषतः शाकाहारींसाठी तर कडधान्य हा प्रथिनांचा पूर्ण स्त्रोत आहे. हिवाळ्यात थोडे उशिरा तर उन्हाळ्यात मोड लवकर येतात. काही कडधान्ये तर फक्त 7-8 तास पाण्यात भिजत ठेवून नंतर मोडाशिवाय वापरली जातात. छोले, राजमा, वाटाणा बहुधा मोडाशिवाय वापरले जातात. पांढऱ्या वाटाण्याचा रगडा सर्वांना आवडतो. कडधान्यांची भेळ, कडधान्ये घालून सॅलड्सही बनवली जातात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काही कडधान्यांच्या कृती
छोले सॅलड
साहित्य – वाटीभर छोले रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. 1 कांदा बारीक चिरून घ्यावा. हिरवी, लाल, पिवळी अशा तीन रंगांची सिमला मिरची (प्रत्येकी 1) लांबट चिरून घ्यावी. 1 मोठा टोमॅटो चिरून घ्यावा. आवडीप्रमाणे 1 हिरवी मिरची चिरून घ्यावी. एका लिंबाचा रस, मीठ, मीरपूड, साखर चवीनुसार घ्यावे. चमचाभर चाट मसाला (ऐच्छिक), थोडी कोथिंबीर.
कृती – वरील सर्व साहित्य एकत्र करून नीट कालवून सॅलड बनवावे. कोथिंबिरीने सजवावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
पेसरट्टू (मुगाचे डोसे)
साहित्य – 2 वाट्या मोड आलेले मूग, आवडीप्रमाणे 2 ते 4 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, जिरे, मीठ, कोथिंबीर, तेल.
कृती – मोडाचे मूग, हिरव्या मिरच्या, आले, अर्धा चमचा जिरे- सर्व मिक्सचरमध्ये वाटून घ्यावे. त्यात मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून दोशासाठी सरसरीत पीठ तयार करावे. (आवडत असल्यास त्यात दोन पाकळ्या लसूण घालावा.) नॉनस्टिक पॅनवर थोडे तेल घालून डोसे बनवावेत. हे हिरवेगार डोसे छान दिसतात. खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला द्यावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply