भेळ, पाणीपुरी, चाट ही नावे उच्चारली तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते; कारण हे पदार्थ लहानथोर सर्वांनाच प्रिय आहेत. उत्तर भारतात सामोसे, कचोरी, पाणीपुरी वगैरे सर्वच पदार्थ चाट या नावाखाली मोडतात. मूळचे उत्तर भारतातील हे पदार्थ पंजाबमध्ये रुजले व हळूहळू भारतभर त्यांचा प्रचार झाला. आता ते संपूर्ण भारतात लोकप्रिय झाले आहेत. एका उत्तर भारतीयला चाट या लोकप्रिय नावामागील रहस्य विचारले असता त्याने गमतीचे उत्तर दिले, “”इसे चाटचाट के खाते है, इसलिये इसे चाट कहते है।” खरोखरच मिटक्याू मारत चाटून पुसून खाण्याचा हा पदार्थ आहे. भेळ, पाणीपुरी, रगडा पॅटिस, वडे हे “चाट’चे खास प्रकार. त्यातल्या त्यात पाणीपुरी साऱ्यांचीच आवडती, पण बाहेर खाताना धसका घेतला जातोय… घ्यायला हवाच. पण मुळात प्रॉब्लेम आहे, तो स्वच्छतेचा. त्यामुळे असे पदार्थ घरी बनवता आले तर ? पाणीपुरी इतके “चाट’चे बाकी प्रकार पण आपल्या आवडीचे आणि आपण स्वत: ते बनविल्यावर स्वच्छता हा प्रश्न येत नाही. म्हणूनच खास हे खास “चाटचे प्रकार’.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
चाटसाठी लागणारी चटणी
हिरवी चटणी
भरपूर कोथिंबीर, थोडा पुदिना, हिरव्या मिरच्या, आल्याचा कीस, जिरे व मीठ घालून मिक्सणरमधून फिरवून घ्यावे. गरजेनुसार पाणी घालून सरसरीत हिरवी चटणी तयार करावी. आवडत असल्यास या चटणीत लसूणही घातला तरी चालतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
गोड चटणी
चिंचेचा कोळ घेऊन त्यात योग्य प्रमाणात गूळ घालून उकळून घ्यावे. त्यात थोडी धनेपूड, जिरेपूड घालावी. हिंग, थोडे तिखट व चवीनुसार मीठ घालून सारखे करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
काही चाट चे प्रकार
एस.पी.डी.पी.
साहित्य १०-१२ भेळेच्या चपट्या पुऱ्या, उकडलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, बारीक शेव, हिरवी चटणी व चिंचेची चटणी, दही, कोथिंबीर.
कृती:- भेळेच्या चपट्या पुऱ्या बशीत मांडून ठेवाव्यात. त्यावर उकडलेल्या बटाट्याच्या बारीक फोडी व चिरलेला कांदा घालावा. मग त्यावर बारीक शेव व दोन्ही चटण्या घालाव्यात.
त्यावर भरपूर फेटलेले दही घालावे व सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर पेरावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
गोलगप्पे चाट
साहित्य:- १२ ते १५ पाणीपुरीच्या फुगलेल्या पुऱ्या, उकडलेला बटाटा, उकडलेले मोड आलेले मूग, दही, बारीक शेव, आवडत असल्यास बारीक चिरलेला कांदा, हिरवी व गोड चटणी, कोथिंबीर.
कृती पुऱ्यांना मधोमध भोक पाडून डिशमध्ये त्या मांडून ठेवाव्यात. प्रत्येक पुरीमध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, थोडे उकडलेले मूग, हवा असल्यास कांदा घालावा.
या पुऱ्यांवर फेटलेले भरपूर दही व बारीक शेव घालावी. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply