
साहित्य: प्रत्येकी अर्धी वाटी अळीव, ओलं खोबरं आणि बारीक रवा, दीड वाटी दूध, १ वाटी बारीक चिरलेला गूळ, दोन चमचे तूप, चवीला मीठ, अर्धा चमचा जायफळ पावडर, दीड वाटी कणीक, तेल
कृती:- एक वाटी दूध गरम करून त्यात अळीव भिजत घालावे. दोन तासाने तुपावर रवा भाजून घ्यावा, त्यात खोबरं, चिमूटभर मीठ, अळिवासकट दूध
आणि उरलेलं दूध घालून रवा शिजवावा, त्यात गूळ घालून मऊ सांजा करावा, जायफळ घालावं. कणकेमध्ये चवीला मीठ आणि एक मोठा चमचा तेल घालून सैलसर कणीक भिजवावी. थोडय़ा वेळाने कणकीच्या पारीत सांजा भरून, लाटून पोळ्या भाजाव्या. हा पराठा खायलाही चविष्ट आणि पौष्टिकही असतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply