साहित्य :- पारीसाठी – 2 कप कणीक, दोन टेबल स्पून मोहन, मीठ, ओवा घालून घट्ट भिजवावी. सारणासाठी – 1 कप किसलेलं पनीर, 1 कप बटाट्याचा लगदा, आलं – मिरची चिरून, चाट मसाला. स्पेशल मसाला – 4 लहान वेलदोडे, 4 लवंगा, प्रत्येक दोन चमचे जिरे व मिरे, 1 तुकडा दालचिनी. सर्व कुटून घ्यावं. तूप व हिंग.
कृती :- तूप, हिंग, आलं मिरची एकत्र परतावं. पनीर, बटाटा, मीठ, तिखट, चाट मसाला, स्पेशल मसाला हवा तेवढा घालून चटपटीत सारण बनवावं. सारण कोरडं होऊ द्यावं. पिठाच्या पारीत सारण भरून जाड व मोठ्या पुऱ्या बनवून तळा, दह्याबरोबर द्यावं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply