साहित्य- पाच-सहा बटाट्याच्या (साले काढून) चौकोनी फोडी, एक जुडी मेथीची पाने धुवून बारीक चिरून, दोन-तीन चमचे तेल, मोहरी, हिंगपूड, थोडी हळद, एक चमचा धनेपूड, आवडीप्रमाणे तिखटपूड, चवीनुसार मीठ व किंचित साखर.
कृती – तेलात मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करून त्यात बटाट्याच्या फोडी घालून परताव्यात.
थोडे शिजत आल्यावर चिरलेली मेथी धनेपूड, तिखट, मीठ, साखर घालावी. नंतर बटाटे व मेथी मिसळून शिजवावी. ही भाजी सुकीच असते. याचप्रमाणे वांगी मेथी, मुळा मेथी करतात. किंबहुना कोणत्याही भाजीत मेथीचा स्वाद छान लागतो. मांसाहार करणारे मेथी खिमा बनवतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply