साहित्य:- दीड वाटी हापूस आंब्याचा रस, तीन वाट्या साखर (हे एकत्र करून नॉनस्टिक भांड्यात आटवून गोळा करा. जास्त कोरडा होऊ देऊ नका.), दीड वाटी मैदा, पाव वाटी तेल, एक चमचा वेलची पूड, मीठ, लाटायला पिठी.
कृती:- मैद्यात तेल व मीठ घालून पीठ घट्ट भिजवून खूप मळावे. आंब्याच्या गोळ्यात वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करावे. चिकट वाटले तर पिठीचा हात घ्यावा. मैद्याच्या गोळ्याच्या दोन पारी करून मधे आंब्याच्या गोळ्याची पारी घालून बंद करावे. पिठीवर पोळी लाटून मंद आचेवर खरपूस भाजावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply