साहित्य : दोन रायवळ आंबे, एक हापूस आंबा, तीन चमचे तेल, दीड चमचा तिखट, मोहरीची पातळसर पेस्ट दोन चमचे, नारळाचा चव ३ ते ४ चमचे, मेतकूट २ चमचे, अर्धी वाटी उकळलेले गुळाचे पाणी, मोहरी, िहग, हळद.
कृती : दोन्ही प्रकारचे आंबे थोडे कमी उकडून सोलून गर काढावा. कढईत तेल घालावे. मोहरी, हिंग, हळद घालून खमंग फोडणी करावी. आंब्याच्या साली व बाठी गरातच ठेवाव्यात. मोहरीचे पाणी घालून फेटून दोन चमचे पातळसर पेस्ट करावी. ती गरात घालावी. तिखट-मीठ, नारळाचा चव, मेतकूट आणि गुळाचं पाणी घालावं. थंड झालेली फोडणी आणि सगळं छान एकत्र कालवावं.
Leave a Reply