साहित्य : १ मोठी वाटी चुरलेल्या शेवया, पाऊण वाटी साखर, पाव चमचा मीठ, अर्धी वाटी हापूसच्या आंब्याचा रस, तूप.
कृती : प्रथम ४ वाट्या पाणी उकळण्यास ठेवावे. त्यात थोडे मीठ व अर्धा चमचा तूप घालावे. पाण्याला उकळी आली की त्यात शेवया टाकून जरा उकळू द्यावे. शेवया शिजल्या की लगेच चाळणीवर ओताव्या व वरून गार पाणी घालावे. साखरेत अर्धी वाटी पाणी घालून गोळीवद पाक करावा. नंतर त्यात आमरस घालून जग उकळू द्यावे. नंतर त्यात वरील शेवया घालाव्या. पाणी आटले की कडेने थोडेसे साजूक तूप सोडून उतरवावे.
Leave a Reply